आयशर टेंम्पोसह २४ लाखांचा अवैध गुटखा जप्त, तिघा जणांवर गुन्हा दाखल


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

भिगवण (११ जून) :- अवैध गुटखा अथवा गुटखा बनवण्याकामी प्रतिबंधित असलेला जवळपास २४ लाखांचा कच्चा माल भिगवण पोलीसांकडून जप्त करण्यात आला असून, रात्री (११ जून) साडेबाराच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर पेट्रोलिंग दरम्यान भादलवाडी (ता. इंदापूर) हद्दीत भिगवण पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ज्ञानेश्वर दगडू महाकाळ, सुनिल मारूती बिचकुले आणि अमोल प्रकाश साळुंके अशी अटक करण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तिघा जणांची नांवे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, रात्री (११ जून) साडेबाराच्या सुमारास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पठाण व होमगार्ड माने पुणे सोलापूर हायवेवर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना भादलवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा किंवा गुटखा बनवण्याकामी लागणारा तब्बल २३ लाख ७३ हजार ८४९ रूपायांचा कच्चा माल घेऊन जात असलेला चॉकलेटी आयशर टेंम्पो (एम. एच. ४५ ए.एफ. ५४५४) आढळून आला. भिगवण पोलीसांकडून मुद्देमालासह हा टेंम्पो जप्त करण्यात आला असून, सोलापूर जिल्ह्यातील (बामणी, ता. सांगोला) ज्ञानेश्वर दगडू महाकाळ (वय २५ वर्ष), सुनिल मारूती बिचकुले (वय २७ वर्ष) आणि अमोल प्रकाश साळुंके (वय २१ वर्ष) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस हवालदार पठाण, पोलीस हवालदार वारगड, पोलीस कॉन्स्टेबल वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल गडदे व होमगार्ड माने यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट