मुत्सुद्देगिरीच्या बातमीचा इम्पॅक्ट - जोगवा मागण्याच्या बहाण्याने हिप्नोटाईज करून लुबाडणारी ती महिला अवघ्या काही तासांत जेरबंद

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२८ ऑगस्ट) :- हिप्नोटाईज करून राजेवलीनगर येथील दिपाली लक्ष्मण खरात या गृहिणीला लुबाडणारी ती आरोपी महिला मुत्सुद्देगिरीच्या बातमीच्या परिणामी तथा पत्रकारांच्या सतर्कतेने अखेर जेरबंद झाली. माया सागर साळुंखे (रा. ५८ फाटा, माळशिरस, जि. सोलापूर) असे या महिलेचे नाव असून, इंदापूर अकलूज रोडवरील पाटील दवाखान्याच्या पुढे, तथा अकलूज ब्रीजनजीक तिला पकडण्यात आले. आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास दैनिक प्रभातचे पत्रकार  आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष निलकंठ मोहिते यांनी या महिलेला ओळखल्याने ही बाब उघडकीस आली.

अवघे २२ वर्ष वय असलेल्या या महिलेला पकडल्यानंतर पत्रकार निलकंठ मोहिते यांनी मुत्सुद्देगिरीचे उपसंपादक समीर सय्यद यांना फोन करून या घटनेची कल्पना दिली. तदनंतर पत्रकार समीर सय्यद यांनी घटना घडलेल्या परिसरातील अरबाज शेख, प्रदीप रुपनवर यांना कळवले. यावेळी या दोघा युवकांनी दिपाली खरात यांना घटनास्थळी बोलावून आरोपी महिलेची ओळख पटविली. विशेष म्हणजे आरोपी महिलेने खुद्द ऑन कॅमेरा हा गुन्हा कबूल केला आहे. या महिलेला पकडल्यानंतर तात्काळ इंदापूर पोलिसांना खबर देण्यात आली. यावेळी पोलीस अमलदार अकबर शेख यांनी घटनास्थळी येत तिला ताब्यात घेतले. मुत्सुद्देगिरीच्या बातमीनंतर अवघ्या काही तासांतच ही महिला पकडली गेली असून, मुत्सुद्देगिरीच्या बातमीमुळेच आपण त्या महिलेला पकडू शकलो असे पत्रकार निलकंठ मोहिते यांनी यावेळी म्हटले. 

मुळ बातमीही वाचा - जोगवा मागायला आली आणि लुबाडून गेली; इंदापूर शहराच्या राजेवली नगर भागातील प्रकार

बुधवारी (२३ ऑगस्ट) सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहरातील राजेवलीनगर (शेंडे मळा) भागातील कृष्णाई अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली होती. जोगवा मागण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपी माया साळुंखे यांनी दिपाली खरात यांना हिप्नोटाईज करत त्यांचे सव्वा तोळे सोने आणि रोख रक्कम लुबाडून नेली होती. या महिलेला पकडल्यानंतर दिपाली खरात आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुत्सुद्देगिरीचे उपसंपादक समीर सय्यद, पत्रकार नीलकंठ मोहिते, पत्रकार तात्या पवार, अरबाज शेख, प्रदीप रुपनवर, इरफान शेख आणि सहकार्य करणाऱ्या इतरांचे आभार मानले.


आरोपी महिलेने दिपाली खरात यांना आधी पिठाचा जोगवा मागितला. तदनंतर घरामध्ये येत चहा बनवून देण्याचा आग्रह केला. दरम्यान, चहा पिताना संसारातील अडी अडचणी आणि संबंधित विषयावर समाधान (solution) सांगत दिपाली यांना हिप्नोटाईज केले. परिणामी, याच भुरळमध्ये दिपाली यांनी स्वतःच हातातील सोन्याची अंगठी काढून देण्यासह एकूण सव्वा तोळे सोने, नवीन साड्या आणि तीन हजारांच्या आसपास रक्कम या महिलेच्या स्वाधीन केली होती. विशेष म्हणजे हा प्रकार घटनेच्या अनेक तासानंतर दिपाली खरात यांच्या लक्षात आला. हा प्रकार पुढील तीन दिवस कोणालाही सांगू नका असा सल्ला आरोपीने खरात यांना दिला होता.

पत्रकार प्रशासनाला सहकार्यही करतात...

पत्रकार आपल्या बातम्यांच्या माध्यमातून केवळ प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवत नाहीत, तर प्रशासनाला, समाजाला सहकार्य देखील करतात हेच या घटनेतून सिद्ध होत आहे. पत्रकार निलकंठ मोहिते यांनी धाडस दाखवत या आरोपी महिलेला सदर ठिकाणी थांबवून, ठेवले होते. पत्रकारांनी धाडस दाखवले नसते तर कदाचित या महिलेने अनेकांना बळीचा बकरा बनवला असता. पत्रकार आपला वेळ बातम्या शोधून, वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून सामाजिक उणीधुणी, समाजातील समस्या, अन्याय, अत्याचाराच्या घटना उघडकीस आणत असतात, प्रशासनावर वचक ठेवत असतात. त्यामुळे किमान समाजाचा आणि प्रशासनातील विविध विभागांचा पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट