दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी इंदापूर पोलिसांकडून जेरबंद


चार अटक, एक फरार; आरोपींची बलात्कार, गँगरेप, दरोडा आणि घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी नुकतीच इंदापूर पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली. शनिवारी (१९ ऑगस्ट) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रेडा-सराफवाडी (ता. इंदापूर) रोडवर जेरबंद करण्यात आलेल्या या टोळीकडून पोलिसांनी स्क्रू ड्रायव्हर, ॲडजेस्टेबल पाना, लोखंडी कटावणी, मिरची पावडर आणि दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. टायटन शिवा भोसले, शामराव उर्फ जगताप काळूराम भोसले, खोपेश्वर उर्फ खोप्या शिवा भोसले, दिलीप सयाजी पवार या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर शिवा मिट्टू भोसले हा आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. हे सर्व आरोपी पिटकेश्वर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील रहिवाशी आहेत. सर्व आरोपींवर पोलीस अंमलदार विनोद गौतम लोखंडे यांच्या फिर्यादीवरून भा.द.वी. कलम ३९९, ४०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर न्यायालयाने आरोपींना २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, अधिक चौकशीनंतर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करत आहेत. या कामगिरीत पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नागनाथ पाटील, पोउनि. सुधिर पाडुळे, सपोफौ. के.बी. शिंदे, पोहवा. सुनिल बालगुडे, मपोह. माधुरी लडकत, पोना. अमोल गायकवाड, सुनिल कदम, कळसाईत, पोशि. विनोद लोखंडे, आरीफ सय्यद, अकबर शेख, विशाल चौधर, सुधिर शेळके, दिनेश चोरमले यांनी सहभाग घेतला.


त्यामुळे इंदापूर पोलिसांची कामगिरी महत्वाची..
.

या आरोपींवर याआधीही इंदापूर, वालचंदनगर, दौंड, नातेपुते आणि सांगोला पोलीस ठाण्यात दरोडा आणि घरफोडीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पैकी टायटन शिवा भोसले या आरोपीवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात बलात्कार, गँगरेप आणि विनयभंगासारखे अतीगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींची पार्श्वभूमी आणि इंदापूर तालुक्यात वाढत्या चोऱ्यांच्या घटना पाहता इंदापूर पोलिसांनी केलेली ही कामगिरी महत्वाची मानली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट