महिलेला ट्रकखाली चिरडणाऱ्या ट्रक चालकाला युवकांनी पाठलाग करून पकडले; एस.बी. पाटील कॉलेजसमोरील घटना


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

बिजवडी (२९ ऑगस्ट) :- एका ३५ वर्षीय महिलेला ट्रक खाली चिरडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाला युवकांनी पाठलाग करून पकडले. ही घटना रविवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील एस.बी. पाटील कॉलेजसमोरील ओव्हरब्रीजवर घडली. या घटनेत रुपाली संतोष रासकर (रा. न्हावी, ता. इंदापूर, जि. पुणे) ही महिला जागीच ठार झाली. या संदर्भात सुनील नामदेव रासकर (रा. न्हावी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान ट्रकचालक संजीव सहादेव विभुते (रा मंटाळ, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) हा अपघात करून पळून जात असताना सचिन मिंड (रा. बिजवडी, ता. इंदापूर) या युवकाने आपल्या मित्रांसह दुचाकीवरून पाठलाग करत त्याला बिजवडी हद्दीत पकडले. युवकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्यावर भा.द.वि. ३०४ अ, २७९ कलमांतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा - मुत्सुद्देगिरीच्या बातमीचा इंपॅक्ट; हिप्नोटाईज करून लुबाडणारी ती महिला अवघ्या काही तासांत जेरबंद

मयत रुपाली रासकर ह्या आपले दीर हनुमंत युवराज रासकर यांच्याबरोबर दुचाकीवरून घरी निघाल्या असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. रविवारी (२७ ऑगस्ट) त्या वैद्यकीय उपचारासाठी इंदापूरमध्ये आल्या होत्या. दवाखान्याचे काम आटोपून त्या घरी जात असताना एस.बी. पाटील कॉलेजच्या समोरील ओव्हरब्रिजवर ट्रकने त्यांच्या दुचाकीला (होन्डा CBZ, एमएच १२ डबल्यू ५१६) पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी हनुमंत रासकर हे बाजूला फेकले जाऊन त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र रुपाली ह्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तदनंतर त्यांना उपचारार्थ इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

(मुत्सुद्देगिरी निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुत्सुद्देगिरीने मीडियाच्या क्षेत्रात अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखो लोकांच्या पसंतीला उतरलेल्या मुत्सुद्देगिरीला तालुक्यात आणि तालुक्याबाहेर घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांपर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी प्रतिनिधींची गरज आहे. ज्यांना या क्षेत्रातील अनुभव आहे त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट