इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठीच्या निधीत आणखी साडे आठ कोटींची भर
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (११ मे) :- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे इंदापूर तालुक्यातील विकास कामांच्या निधीत आणखी साडे आठ कोटींची भर पडली आहे. या निधीतून नागरी सुविधा योजनेंतर्गत तालुक्यातील मंजूर झालेली विविध विकास कामे केली जाणार आहेत. यामध्ये नागरी सुविधांमधून १ कोटी ५७ लाख, लेखाशीर्ष ३०५४ गट ब व क मधून २ कोटी, तर २५१५ योजनेतून ५ कोटी रुपये असा एकूण ८ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती भरणे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
नागरी सुविधा अंतर्गत मंजूर कामे खालीलप्रमाणे
सणसर येथील समर्थ नगर थोरात घर रस्ता ६ लाख, अंथुर्ण शिंदे मळा अंतर्गत रस्ता १५ लाख,अंथुर्णे येथील ४८ फाटा ते दळवी वस्ती रस्ता २० लाख, काटी येथील प्राथमिक शाळा ते महादेव मंदिर रस्ता १० लाख, लासुर्णे येथील ग्रा.पं. लासुर्णे ते माळी मळा रस्ता १० लाख, बिजवडी येथील काळेल वस्ती अंतर्गत रस्ता १० लाख, बेलवाडी येथील कुंभारवस्ती रस्ता १० लाख, लासुर्णे अंतर्गत बंदिस्त गटार १० लाख, सणसर येथील शब्बीर काझी यांचे घराकडे जाणारा रस्ता १० लाख, अंथुर्णे आण्णाभाऊ साठेनगर येथे रस्ता ५ लाख, बावडा येथील जाकीर शेख वस्ती रस्ता ५ लाख, निमसाखर येथील पिरवाडी अंतर्गत रस्ता १० लाख, सणसर येथील समर्थ नगर रस्ता ८ लाख, साईनगर अंतर्गत रस्ता ८ लाख आणि भाग्यनगर अंतर्गत बंदिस्त गटार ५ लाख व अंतर्गत रस्ता १५ लाख, अशी एकूण नागरी सुविधा मधून १ कोटी ५७ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
लेखाशीर्ष ३०५४ गट ब व क मधून दोन रस्त्यांकरिता २ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य मार्ग १२१ सणसर ते रायतेमळा खटकेवस्ती ते सणसर रस्ता करिता १ कोटी ४० लक्ष व डिकसळ ते योगेश्वरी लिफ्ट दशक्रिया विधी घाट रस्ता रुपये ६० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
२५१५ योजनेतून खालील गावांसाठी ५ कोटी रुपये मंजूर - पोंधवडी १० लाख, बेलवाडी ३० लाख, जाधववाडी १० लाख, डाळज नं २ - १० लाख, रणगाव १० लाख, शिरसाटवाडी ५ लाख, हगारेवाडी १० लाख, निरवांगी २५ लाख, जाचकवस्ती ८ लाख, कुरवली १६ लाख, पिंपरी बु. १० लाख, मदनवाडी ३० लाख, बावडा २० लाख, शिंदेवाडी १० लाख, पंधारवाडी ३० लाख, निमसाखर २५ लाख, पळसदेव २० लाख, निरगुडे २० लाख, म्हसोबाचीवाडी २० लाख, भावडी १६ लाख, अगोती नं.१ - २० लाख, वरकुटे बु.३५ लाख, करेवाडी ३० लाख, कालठण नं.१ - २० लाख, भिगवण २० लाख, लाकडी १० लाख, तक्रारवाडी १० लाख, झगडेवाडी १० लाख आणि गोखळी १० लाख असा एकूण ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा