दुचाकींच्या समोरा समोर झालेल्या धडकेत इंदापूर शहरातील २५ वर्षीय युवकाचा मृत्यू; अन्य तिघे गंभीर जखमी


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१४ मे) :- आज (१४ मे) सायंकाळी ७ वा. ३० मिनिटांच्या सुमरास इंदापूर शहरातील खुळे चौकात असणाऱ्या ज्योती स्टील सेंटर या दुकानासमोर दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये इंदापूर शहरातील तौफिक हारून सय्यद या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर सज्जाद युनूस शेख (वय २५ वर्ष, रा. कसबा पेठ, इंदापूर) गंभीर जखमी झाला. समोरून धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघा युवकांना देखील गंभीर इजा झाली असून, जखमींना उपचारार्थ अकलूजच्या खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तौफिक हारून सय्यद आणि त्याचा मित्र सज्जाद युनूस शेख हे दोघे आपल्या दुचाकीवरून खुळे चौकाच्या दिशेने डाव्या बाजूने चालले होते. दरम्यान ज्योति स्टील सेंटर समोर आले असता विरुद्ध दिशेने (राॅंग साईडने) आलेल्या यामाहा आर १५ एम (एमएच ४२ बीजी ०३५८) या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार यामाहा आर वन गाडीवरील दोघे युवक अकलूजच्या दिशेने निघालेल्या डस्टर या चारचाकीला अतिशय वेगाने ओव्हरटेक करत होते. यावेळी दुचाकीचा वेग ताशी १२५ किमी असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांनी चुकीच्या दिशेने जात डाव्या बाजूने निघालेल्या तौफिक सय्यद यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. रक्तबंबाळ अवस्थेत तौफिकला अकलूजच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर सज्जाद यालाही बिचकुले रुग्णालयातून प्राथमिक उपचारानंतर अकलूजच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे दर्शनी भाग आणि  इंजिन अक्षरशः ध्वस्त झाले. धडके नंतर वेगात असलेली आर वन दुचाकी धडकेनंतरही जवळपास ५० मिटर अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात मयत झालेला तौफिक हा ड्रायव्हिंग करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो अतिशय गरीब कुटुंबातील असून, अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावासाठी तो ओळखला जात होता. धडक देणारे दोघे युवकांचा पत्ता समजू शकला नाही.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट