दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच इंदापूरच्या ईदगाह मैदानावर अदा होणार ईदची सामूहिक नमाज; उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांची ईदगाह मैदानांना भेट
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२ मे) :- रविवारी (१ मे) चंद्रदर्शन न झाल्याने आज पवित्र रमजानच्या उपवासाची सांगता शेवटच्या (३० व्या) उपवासाने करण्यात आली. सलग दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे रमजान महिन्यातील अनेक बाबींसह रमजान ईदची नमाज मुस्लिम बांधवांना सामूहिकरित्या ईदगाह मैदानावर अदा करता आली नव्हती. यंदा मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियम शासनाने जवळपास हटवल्याने दोन वर्षातून प्रथमच उद्या ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा सामुहिकरीत्या अदा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट देत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
वर्षातून दोन वेळा (रमजान ईद, ईद उल अजहा) मुस्लिम बांधव सामुहिकरीत्या ईदगाह मैदानावर नमाज अदा करत असतात. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे शासनाच्या नियमांचे पालन करणाऱ्या मुस्लिम बांधवांनी सलग दोन वर्ष ईदची नमाज आपापल्या घरीच अदा केली होती. यंदा मात्र शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियम संपूर्णपणे हटवल्याने साहजिकच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. इंदापूरचा सामाजिक सलोखा संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. यालाच साजेशा वातावरणात संपूर्ण रमजान महिना मुस्लिम आणि मुस्लिमेतर बांधवांनी खेळीमेळीच्या वातावरणात साजरा केला. आता उद्या होणारी ईद देखील अशाच पद्धतीने सर्व मुस्लिम आणि मुस्लिमेतर बांधव एकमेकांच्या गाटीभेटी घेऊन शुभेच्छा देत, शिरखुर्म्याचा आस्वाद घेत साजरा करणार आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांची ईदगाह मैदानांना भेट
उद्या होणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर आज रात्री ९ वा. सुमारास बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, गोपनीयचे प्रवीण भोईटे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह इंदापूर शहरातील दोन्ही ईदगाह मैदानाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मुस्लिम बांधवांशी चर्चा देखील केली. सोबतच त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना उद्या होणाऱ्या ईदच्या शुभेच्छा दिल्या.
इंदापूर शहरातील कोणत्या ठिकाणी किती वाजता अदा होणार ईदची नमाज

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा