होय क्रांतीबा ! मी तुझ्यामुळे पुरोगामी - स्वाती चव्हाण
होय! मी पुरोगामी!!
बा क्रांतीबा, होय, मी तुझ्यामुळे पुरोगामी!
तु साऊला दिलेल्या
अक्षरज्ञानामुळे मी पुरोगामी!
तुझ्या सत्यनिष्ठेवरच्या
असीम विश्वासामुळे मी पुरोगामी!
भांडवलजाद्यांवर ओढलेल्या
तुझ्या आसूडामुळे मी पुरोगामी!
तु गुलामगिरीविरोधात चेतवलेल्या
आगीमुळे मी पुरोगामी!!!
होय,बा क्रांतीबा,तुझ्या विचारांमुळे
मी आज पुरोगामी!!!
तू लिहलेल्या पहिल्या वहिल्या
शिवबाच्या पोवाड्यामुळे मी पुरोगामी!!!
तु काढलेल्या पहिल्या शाळेतल्या
पहिल्या अक्षरामुळे मी पुरोगामी!!
मुक्ताच्या दबलेल्या कंठाला
तु दिलेल्या स्वरामुळे मी आज पुरोगामी!!
होय, बा क्रांतीबा, तुझ्यामुळे
मी आज पुरोगामी!!
तुझ्या मनुवादाविरोधातल्या लेखणीमुळे
मी आज पुरोगामी!!
तु साजरी केलेल्या पहिल्या
शिवजयंतीमुळे मी आज पुरोगामी!!
देवाचं देवत्व नाकारून तु स्वीकारलेल्या
सत्यधर्मामुळे मी आज पुरोगामी!!
साऊनं सहन केलेल्या
दगड-गोट्या, शेणामुळे मी आज पुरोगामी!
अनिष्ट रुढी-परंपरेच्या वादळात
तु पेटवलेल्या ज्ञानमशालीमुळे मी पुरोगामी !
आजही मनुवादी "पुरोगामी" ही शिवी समजून उच्चारतात,
पण मी मात्र मानानं जिरेटोप घालावा, तसं माझं पुरोगामित्व
घेऊन मिरवते, अभिमानानं, कौतुकानं, अन् त्याच विश्वासानं!!
आद्यक्रांतीशाहीर महात्मा जोतीबा फुलेंना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!!!
(लेखिका - स्वाती चव्हाण)

Verryyyy nice n too real...❤👌👌👍
उत्तर द्याहटवाVerryyy much true...nice 👌👌👍
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवा