इंदापूर बंद - तर व्यापाऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचाही बंदला विरोध
रविवार (३१ जानेवारी) : कोरोनाच्या प्रदीर्घ बंदमुळे व्यापारी आणि रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले असताना वारंवार इंदापूर बंदसारख्या प्रयोगांमुळे इंदापूर शहरातील व्यापारी व मजूर वर्ग त्रस्त झाला असून, बंदचे प्रस्थ थांबले नाही तर व्यापारी व मजूर वर्गाच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी इंदापूर शहर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा पावित्रा शिवसेना शहरप्रमुख महादेव सोमवंशी यांनी घेतला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत शिताप यांनी देखील व्यापारी व मजुरांसाठी 'दुष्काळात तेरावा महिना' ठरत असणाऱ्या बंदसारख्या भूमिकांना विरोध दर्शविला असून, बंदसाठी आवश्यक कारणे व योग्य नियमावली असावी अशी भूमिका मांडली आहे.
तर व्यापाऱ्यांच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल - शिवसेना शहर प्रमुख
लॉकडाऊननंतर व्यापाऱ्यांसमोर आजही बऱ्याच समस्या आहेत. लॉकडाऊनसारख्या प्रदीर्घ बंदनंतरही मागील २ महिन्यात ३ वेळा इंदापूर बंद राहिले आहे. इंदापूर शहरात छोटे व्यापारी आणि रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर वर्गाची संख्या अधिक आहे. त्यामुळे वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे या वर्गाच्या आर्थिक घडीवर विपरीत परिणाम होत आहे. मुख्यत्वे व्यापारी आणि मजूर वर्ग, शेतकरी व कामगार कोणत्याही बंदला विरोध करण्यास धजावत नसले तरी आता शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी यांनी निर्णायक भूमिका घेत, वारंवार बंदमुळे व्यापारी आणि मजूर वर्गाला आर्थिक नुकसान होत असून, इंदापूर शहरात वाढत असलेल्या बंदचे प्रस्थ थांबले नाही तर व्यापारी व गरीब मजुरांच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी शिवसेना यापूढे रस्त्यावर उतरेल अशी भूमिका जाहीर केली आहे.
बंदसाठी नियमावली आवश्यक - प्रशांत शिताप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांनी देखील अचानक पुकारण्यात येणाऱ्या बंदला आपला विरोध दर्शविला आहे. अचानक बंदमुळे नाशवंत वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल करताना बंदच्या विरोधात नगरपालिकेत ठराव घेण्याबाबत आपण आग्रही असल्याचे सांगितले. अशा ठरावाबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, यासाठी व्यापारी संघटनेने निर्णायक भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी म्हटले असल्याचे प्रशांत शिताप यांनी सांगितले आहे. बंदसाठी कोरोनासारखी राष्ट्रीय आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, राष्ट्रीय दुखवटा, नैसर्गिक आपत्ती अथवा समाजोपयोगी कारण असणे गरजेचे असून, वारंवार पुकारल्या जाणाऱ्या बंदसाठी नियमावली असणे देखील गरजेचे असल्याचे प्रशांत शिताप यांनी म्हटले आहे.
इंदापूर शहरात व्यापारी संघटनेचे अस्तित्व आहे?
१४ ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे पांधारानाला परिसरातील व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. यावेळी व्यापारी संघटना व्यापाऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी देखील फिरकल्या नव्हत्या. व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आणि वारंवार होत असलेल्या बंदबाबतही व्यापारी संघटना विशिष्ट भूमिका घेताना कधीच दिसत नाहीत. त्यामुळे इंदापूर शहरात व्यापारी संघटनेचे अस्तित्व आहे का? असा सवाल व्यापारी करत आहेत.
बंदला व्यापाऱ्यांचा १००% पाठिंबा असतो?
व्यक्ती, संघटना अथवा राजकीय पक्षांकरवी बंदच्या आवाहनाला पाठिंबा देण्याची व्यापारी, शेतकरी, मजूर आणि एकंदरीतच नागरिकांची इच्छा असो अथवा नसो, मात्र त्यांनी 'अहो रूपम अहो ध्वनी' या म्हणीनुसार बंदला १०० टक्के पाठिंबा दिला असेच वाटते. मात्र, व्यवसाय बंद ठेवण्याचा मुख्य हेतू वाद-विवाद आणि भांडण-तंट्याच्या शक्यता टाळणे हा असल्याचे व्यापारी सांगतात. बंदचे आवाहन करण्याचा प्रत्येकाला संवैधानिक अधिकार असला तरी, बंदला हिंसक वळण लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ बंदनंतरही वारंवार इंदापूर बंद होत असल्याने व्यापारी व रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर वर्गासाठी हा 'दुष्काळात तेरावा महिना' ठरत आहे. त्यामुळे गांव बंदचे वाढते प्रस्थ, इंदापूरकर मात्र त्रस्त असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.




I support to you
उत्तर द्याहटवाSupport you
हटवाSupport you
हटवाशहर बंद ची वारंवार हाक देणे, हे अत्यंत आवश्यक कारणासाठीच असावे. अन्यथा बंदमध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये. बंदसाठी नियमावली ठरविण्यात यावी.
उत्तर द्याहटवा