हिंदू जननालायकाच्या सभेसाठी प्रशासनाच्या २४ तास बैठका सुरू होत्या मात्र...

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (८ मे) :- हिंदू जननालायकाच्या सभेसाठी प्रशासनाच्या २४ तास बैठका सुरू होत्या मात्र निर्ममपणे हत्या करण्यात आलेल्या मनोज आव्हाड याच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नव्हता अशी तिखट प्रतिक्रिया देत लहुजी शक्ती सेना या राष्ट्रव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी औरंगाबाद खून खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी शासन आणि प्रशासनाकडे केली आहे. औरंगाबाद खून खटल्या प्रकरणी शुक्रवारी (६ मे) लहुजी शक्ती सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी ते बोलत होते.

औरंगाबाद येथील मेघावाले सभागृहात साफसफाईचे काम करणाऱ्या २७ वर्षीय मनोज शेषराव आव्हाड या युवकावर लॉनमधील फोकस लाईट चोरल्याचा आरोप करत टोळक्याने २० एप्रिल रोजी त्याचे हात पाय बांधून लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संविधान पुंजाराम जाधव, सागर गणपत खरात, सनी गणपत खरात, सतीश भास्कर खरे, आनंद लक्ष्मण गायकवाड, आनंद भाऊसाहेब सोळसे, अष्टपाल रमेश गवळी, शिवम नरेंद्र तुपे अशा अनेक संशयित आरोपींना सिडको पोलिसांनी अटक केली होती.


दरम्यान, या घटनेचा निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी विष्णूभाऊ कसबे यांनी तिखट प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांच्यासह प्रशासनावर आगपाखड केली. दहशत बसवण्यासाठी टोळक्याने मनोजची हत्या केली आहे. या प्रकरणाकडे लक्ष देण्याऐवजी हिंदू जननालायकाच्या सभेसाठी प्रशासनाच्या २४ तास बैठका सुरू होत्या. मात्र एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला मनोजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार द्यावासा वाटला नाही. जिल्ह्याचे पालक असलेले जिल्हाधिकारी देखील मनोजच्या कुटुंबीयांकडे फिरकले नसल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी संघटनेकडून हा खून खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, पीडित कुटुंबाला सरकारी मदत मिळावी, औरंगाबाद पोलीस आयुक्तांची तात्काळ बदली करण्यात यावी, संबंधित आरोपींवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे को. क. प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, अनिल हातागळे, पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जगताप, पश्चिम युवक जिल्हाध्यक्ष संजय फ़ाजगे, जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट, समन्वयक आदीकबापू ओव्हाळ, विलास आढागळे, महिला आघाडी पूर्व जिल्हाध्यक्ष फुलाताई थोरात, पश्चिम महिला जिल्हाध्यक्ष लोफाताई भगत, आशाताई आवळे, राजेंद्र भिसे, अविनाश खिलारे, अमोल कसबे, अशोक बोभाटे, नितीन वायदंडे, आकाश म्हात्रे, युवराज कुचेकर, दत्ता धडे, यांच्यासह जिल्हाभरातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

  1. अगदी बरोबर मातंग ह्रदय सम्राट आदरणीय विष्णु भाऊ कसबे क्रांतिकारी जय लहूजी भाऊ

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट