आरोपींनाही अनेक कायदेशीर व मूलभूत अधिकार - ॲड. आशुतोष भोसले
| उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना ॲड. भोसले |
न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. डी. वडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला, ॲड. एस. बी. पाटील, ॲड. बी. पी. जगताप, ॲड. आबासाहेब तोरणे, ॲड. अक्रम आसिफ शेख, ॲड. राकेश शुक्ल, ॲड. प्रवीण बारवकर, ॲड. रवी कोकरे, ॲड. माधव शितोळे, ॲड. समीरण पोळ, ॲड. संदीप बांदल, ॲड. संज्योत शिंदे, पक्षकार व अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी ॲड. आशुतोष भोसले यांनी आरोपींच्या कायदेशीर व मूलभूत अधिकारांबाबत उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन करताना, कायदेविषयी अज्ञानता अनेक आरोपींच्या समस्यांचे मूळ कारण बनत असल्याचे म्हटले. आपल्याला कोणत्या कलमांतर्गत अटक करण्यात आली हे जाणण्याचा, त्या कलमांचा अर्थ, घरच्यांना सूचित करण्याचा आणि वकिलांशी संपर्क करण्याचा कायदेशीर अधिकार आरोपींना असून, अटकेत असताना शासकीय खर्चातून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा व कौटुंबिक आणीबाणी प्रसंगी पॅरोलवर सुट्टी मिळवण्याचा अधिकारही त्यांना असल्याचे भोसले यांनी म्हटले. सोबतच त्यांनी अनेक खटल्यांच्या निकालांचे संदर्भ देत, आरोपी व कैद्यांच्या हक्क व अधिकारासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी, ॲड. अक्रम आसिफ शेख यांनीदेखील मार्गदर्शन करताना, युवा पिढीने भारतीय संविधानाचे वाचन करणे आणि कायद्याविषयी आपल्या मूलभूत हक्कांची व अधिकारांची माहिती आत्मसात करणे आजची गरज असल्याचे म्हटले. हा कार्यक्रम बार असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले.
कोरोना संकटग्रस्तांचे खटले मोफत दाखल केले जातील - एस. डी. वडगावकर, प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, इंदापूर न्यायालय
कोरोना काळात झालेल्या जिवीतहानीमुळे अनेकजण अनाथ झाले आहेत. ओढवलेले आर्थिक संकट आणि कायदेशीर बाबींच्या अपुऱ्या ज्ञानामुळे अशा लोकांना सध्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा संकटग्रस्त लोकांकडून परिस्थितीच्या अनुषंगाने दाखल करण्यात येणारे खटले मोफत दाखल करून घेतले जातील. सोबतच राज्यशासन आणि NALSA च्या माध्यमातून त्यांच्यासाठी मोफत कायदेशीर मार्गदर्शन आणि वकिलांची नेमणूक देखील करण्यात येईल.
अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. अभिनंदन.
उत्तर द्याहटवावकील साहेब👍🏻👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाKhupach chaan vakeel saheb
उत्तर द्याहटवा