मुस्लिम वेष धारण करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी जाणून घेतला पोलीसांचा बर्ताव
शुक्रवार (७ मे) : बुधवारी (५ मे) पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी पोलीसांचा सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेल्या कामाच्या पध्दती आणि बर्ताव जाणून घेण्यासाठी एका मुस्लिम दांपत्याचे वेषांतर करून वेगवेगळ्या समस्यांसह पिंपरी चिंचवड, हिंजवडी आणि वाकड पोलीसांशी मदतीसाठी संपर्क साधला. यामध्ये त्यांना पिंपरी पोलीस ठाण्यात अतिशय वाईट तर हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात चांगला अनुभव आला.
बुधवारी रात्री पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे दाढी, लालसर केसांचा विग, पांढरी टोपी, सलवार कुर्ता आणि मास्क असा मुस्लिम व्यक्तीचा वेष परिधान करून 'जमालखान कमालखान पठाण' बनले होते. तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे ह्या त्यांच्या बेगम बनल्या होत्या. वेषांतर केल्यानंतर पठाण झालेले पोलीस आयुक्त आपल्या बेगम बरोबर पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर उतरले होते.
यावेळी आयुक्तांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून 'आमच्या शेजारी असलेल्या कोविड रुग्णासाठी ऍम्ब्युलन्सवाल्याला कॉल केला तर तो आठ हजार रुपये भाडे सांगून आमची अडवणूक करत असल्याची तक्रार केली. लगेचच नियंत्रण कक्षातून ही माहिती पिंपरी पोलीसांना देण्यात आली. पीडित व्यक्तीने फोन केल्यास घटनास्थळी जाणे पोलीसांना क्रमप्राप्त असताना पिंपरी पोलीसांनी घटनास्थळी जाण्याऐवजी उलट या पठाण दांपत्यालाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
यावेळी पठाण दांपत्य रात्री सव्वाबाराच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्यात खासगी टॅक्सी करून गेले. ऍम्ब्युलन्सवाला आम्हाला लूटतोय, आमची तक्रार दाखल करून घ्या', अशी फिर्याद पठाण दांपत्याने पोलीसांकडे केली. यावर पोलीसांनी पठाण यांना ‘हे आमचे काम नाही' असे सांगून झिडकारण्याचा प्रयत्न केल्याने सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अशी वागणूक देत असल्याच्या अनुभवामुळे पठाण झालेले पोलीस आयुक्त भलतेच संतापले आणि त्यांनी तात्काळ आपली खरी ओळख सांगून संबंधित पोलीसांना जाब विचारला.
मुस्लिम वेष परिधान करण्यामागे तक्रार घेऊन आलेल्या सर्वसामान्य व्यक्तींना पोलीस कशी वागणूक देतात हा यामागचा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा उद्देश असल्याचे कळते. या वाईट अनुभवानंतर या पठाण दांपत्याने त्याच रात्री हिंजवडी आणि वाकड भागातील रहिवाशी असल्याचे सांगत पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन करून वेगळी समस्या सांगितली व हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्यांना भेट दिली.
हे देखील वाचा - होय ! भारत एवढा असहाय कधीच नव्हता.
हिंजवडी पोलीस ठाण्यात आणि वाकड पोलीस ठाण्यात त्यांनी 'आमचे रमजान महिन्याचे उपवास असून, काही लोकं आमच्या परिसरात मुद्दामहून रोज फटाके वाजवतात, त्याचा आम्हाला त्रास होतो. आम्ही सदर लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली व मला मारहाण केली असल्याचे सांगितले. या झटापटीत एका गुंडाचा मोबाईल माझ्या हातात आला आहे' अशी तक्रार त्यांनी पोलीसांकडे केली.
सदरच्या पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कच्ची फिर्याद तयार करून ही माहिती वरिष्ठांना कळवली व ते येईपर्यंत या दांपत्याला थांबण्याची विनंती केली. पोलीसांनी दिलेल्या या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे पोलीस आयुक्तांना हायसे वाटले. त्यानंतर त्यांनी आपली खरी ओळख दाखवून पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे गुंडांना चाप आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीसांमध्ये प्रामाणिकपणा आणि शिस्त असणे महत्वाचे असते. याचाच चाखाचोळा घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मुस्लिम वेष परिधान करून पोलीस ठाण्यांवर अचानक टाकलेल्या धाडीमुळे पोलीस आयुक्तांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



खूप सुंदर
उत्तर द्याहटवाखुप सुंदर
हटवाअसं अनेक ठिकाणी तपासणी व्हावी.
Really ,He is Dutiful Police Officer.
उत्तर द्याहटवाअतीशय सुंदर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाराजा चांगला असलयास ,अधिकारी,कृमचायृांना ,मनातून
उत्तर द्याहटवानसुनसुदधा "चांलेवहावे लागते"
सगळंकाही "राजाचया नियतीवर
" आवलंबून" असते
तसेच,तयापरमाणे तया राजाचया
राजवटीत "ईशवरी बरकत/ वरदान
पृकोप" ला सामोरे जावेलागते।।
मधयकालीन "मुसलमान राजवटीचा
ईतिहास वाचा/ मुसलमान " कलीफ़ां"
चा ईतिहास" वाचा,आशचयृचकितत
वहाल वाचुन
पण कोण कशाला वाचणार?????
आणी कुठुन वाचनार?????
कायकरनार वाचून????
8180877908
खूप छान सर ज्या पद्धतीने समोरच्या व्यक्तींची उलट तपासणी करून स्वतः सामान्य नागरिकांना काय सोसावं लागते आहे, याच खूप महत्वपूर्ण उदाहरण दिले
उत्तर द्याहटवालोकशाही मध्ये बेजबाबदार कर्मच्यारी 99 % आसेच कर्मच्यारी प्रत्येक विभागात आहेत हा कँनसर पेक्षा ही भयकर रोग जडला आहे , हयावर एकच जालीम उपाय हुकुमशाही आहे
उत्तर द्याहटवासगडी कड़े हेचचालाए तुम्ही स्वता पहिला सर
उत्तर द्याहटवासर खर्च सर सलाम तुमच्या काम करण्या पध्दतीला
उत्तर द्याहटवासर, एकदम मस्त. आज पुन्हा एकदा अमरावतीची आठवण झाली.
उत्तर द्याहटवाKrushnprakash sahab ka kam bahot alag hai .bahot km sahab k jaise officer apne desh me hai
उत्तर द्याहटवासही काम किया सर salute hai aapko
उत्तर द्याहटवाNice duty hinjewwdi police I am proud of
उत्तर द्याहटवाKhup changle kam kele sir tumhi panTumcya parisarat frod kam karnare ajun khup lok ahet tyanchi kortat kes chalu ahe pan khup divad zhale te ajun hajar zhale nahit tya vishyat pan tumhi jar ka mahiti ghetli tar amchi fasavnuk karnare pan lavkar pakadle jatil sir ani vishesh mhanje tyanche phone chalu ahet pan policanche pan phone te lok receive karat nahi plz tumhi mahiti ghya sir
उत्तर द्याहटवा